जिल्ह्यात 9 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 128 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत कोरोनाने 334 बळी घेतले आहेत.

मागील 24 तासात नव्याने 9 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 331 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 128 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 61 हजार 698 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात एकही रुग्ण बरा झाला नसून आता पर्यंत 8 हजार 851 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून  जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 334 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.85 टक्के आहे.