दुचाकी दरीत कोसळून दुचाकीस्वार ठार

संगमेश्वर– संगमेश्वर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या ओझरखोल येथे दुचाकी दरीत कोसळून दुचाकी चालक जागीच ठार झाला. शनिवारी सकाळी हा दुर्दैवी अपघात घडला. 

संकेत विजय चव्हाण असे दुचाकी चालकाचे नाव असून तो लांजा येथील रहिवाशी आहे. अनोळखी वाहनाने धडक दिल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून  शनिवारी सकाळी हा अपघात घडला. या अपघाताची माहिती समजताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुचाकी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.