जिल्ह्यात युके वरून आले आणखी सातजण

रत्नागिरी:-जिल्ह्यात युकेवरून आणखी 7 जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू आहे.

दरम्यान दिनांक 5 डिसेंबर नंतर जिल्ह्यात आलेल्या आणखी 7 जणांची यादी जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाली आहे. या यादीतील लोकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू झाले आहे. या नव्या यादीतील चिपळूण, उभाळे, दापोली, देवरुख येथील नागरिक आहेत. यांचा शोध सध्या सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी देखील काहीजणांची यादी आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाली होती.  सुरक्षेच्या कारणास्तव या सर्वांची स्वाब टेस्ट करून त्यांना विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. आता आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्याचे काम यंत्रणे मार्फत सुरू आहे.