जिल्ह्यात 24 तासात 18 नवे पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- मागील मागील 24 तासात 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 194 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 327 आहे.  
 

मागील 24 तासात नव्याने 18 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 130 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 194 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 58 हजार 675 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 11 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 622 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 327 झाली असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.43 टक्के आहे