माळनाका येथील हॉटेल बाहेरील अतिक्रमणवर हातोडा 

रत्नागिरी:- शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि खोके हटवल्यानंतर आता अनधिकृत बांधकामे रनप प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. मंगळवारी हॉटेल सनस्टारचे बाहेरील कॉर्नरचे अतिक्रमण हटवण्यात आले. नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव विभागानेे कारवाई केेली. यावेळी हॉटेल सनस्टारचे बाहेरील कॉर्नरचे अतिक्रमण हटविले. 

रत्नागिरी नगर परिषदेने मंंगळवारी सकाळी थिबा पॅलेस रोडवरील  हॉटेल सनस्टारचे केलेले रस्त्याजवळील अतिक्रमण हटविले. रनपच्या अतिक्रमण हटाव पथकाने जेसीबी सह कारवाई केली. हॉटेलच्या बाहेरील  रस्त्याजवळील कॉर्नर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने पाडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी  ही उपस्थित होते.