अर्थव्यवस्थेचा कणा उध्वस्त करण्याचा मोदींचा डाव: नंदकुमार बघेल

रत्नागिरी:- देशात संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे देशातील शेतकरी हा देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि हा कणा उध्वस्त करण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातला आहे. देशातून हद्दपार करण्यासाठी सर्वात बहुजन पक्षांनी एकत्र येऊन ही मोदी शाही हद्दपार करण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी केले आहे, ते रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ज्या संविधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुर्चीवर विराजमान झाले तेच संविधान आता उध्वस्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू झाला आहे. बहुजनांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे हे संविधान वाचण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये भाजप हद्दपार झाली. त्याच पद्धतीने देशातून इव्हेंट एबीएम मशीन द्वारे होणारे मतदान प्रक्रिया बंद झाल्यास पुन्हा या देशातून हद्दपार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे देखील आता ईव्हीएम विरोधात आवाज देण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात ईव्हीएम विरोधात संघर्ष होणे गरजेचे आहे यासाठी प्रखर विरोध व्हायला हवा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

देशात छोटी केवढे पक्ष मोठ्या संख्येने आहेत, त्या सर्व पक्षांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. एकाच झेंड्याखाली येऊन निवडणूक लढवून भाजपला हद्दपार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी ऍग्रो हब होणे गरजेचे आहे आज सर्वच राज्यात ‘ऍग्रोवन’च्या माध्यमातून अर्थकारण किंवा त्या राज्याची अर्थव्यवस्था चालली पाहिजे शेतकऱ्यांसाठी विहीर योजना आणणे गरजेचे आहे आज शेतकरी जगला तर देश बदल त्यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले तसेच बहुजन शेतकरी समाजाने स्थानिक पातळीवर आंदोलने करून दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केले.

भारत चीन युद्ध केव्हा होईल यावर बोलताना ते म्हणाले की युद्ध केव्हा होईल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्ध करणार नाहीत वेळ पडल्यास ते स्वतःची हस्तक बनतील किंवा नामोहरम करायचे असेल तर सर्व चिनी उत्पादनांवर बंदी येणे गरजेचे आहे त्यासाठी देशाने आपली रणनीती ठरवली पाहिजे असे मत व्यक्त करून येत्या 27 डिसेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकरी त्याचबरोबर ईव्हीएम बाबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.