चोवीस तासात 11 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण रुग्णसंख्या नऊ हजार पार

रत्नागिरी:- जिल्ह्यात 24 तासात 11 तर मागील तीन दिवसात 37 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील 24 तासात 141 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील 24 तासात एकही रुग्ण मृत्युमुखी पडला नसून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 325 आहे.  
 

मागील 24 तासात नव्याने 11 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 141 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 57 हजार 642 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 11 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 566 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 325 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 95.07 टक्के आहे