जिल्ह्यात 24  तासात 15 नवे पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- मागील चोवीस तासात पुन्हा 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 122 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 159 रुग्ण उपचाराखाली आहेत. 
 

नव्याने 15 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 901 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 122 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 55 हजार 597 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 7 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 367 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 322 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.00 टक्के आहे