चिपळूण तालुक्यातील असुर्डे धरणात महीलेसह दोन मुलांचे मृतदेह

चिपळूण:- तालुक्यातील असुर्डे धरणात बुधवारी महीलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळले मात्र त्यांनी आत्महत्या केली की बुडाले याबाबत तपास सुरु आहे.पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे तिघेही काल धरण परिसरात लाकडे आणण्यासाठी गेले होते.त्यानंतर ते घरी परतले नाहीत.गावक-यांनी शोध घेतला असता बुधवारी सकाळी त्यांना धरणाच्या पाण्यात तिघांचे मृतदेह दिसून आले. मयुरी बाबाराम चौगुले ( ३५ ) हर्ष बाबाराम चौगुले ( ११ ) शारदा बाबाराम चौगुले ( १३ ) अशी नावे आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे.