रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील शिर महालक्ष्मी येथे पूर्ववैमनस्यातून एकाला काठीने आणि दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शुक्रवारी घडली.
शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास
गणपत जानू गोरीवले (रा.गोरीवलेवाडी,गुहागर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने वसंत गणपत गोरीवले (रा.गोरीवलेवाडी, गुहागर) यांना मारहाण केली.तर याबाबत एकनाथ कृष्णा सुर्वे (59,रा.शिर खालची ठोंबरेवाडी,गुहागर) यानीं तक्रार दिली आहे. त्यानुसार,मंदिराच्या पुजेच्या मागील वादातून शुक्रवारी सायंकाळी गणपत गोरीवले याने वसंत गोरीवले याला शिर महालक्ष्मी येथे जाणार्या डांबरी रस्त्याला जोडणार्या पायवाटेवर काठी आणि दगडाने डोक्याच्या पाठीमागे मारुन गंभीर दुखापत केली.याप्रकरणी अधिक तपास गुहागर पोलिस करत आहेत.