रत्नागिरीत विनामास्क फिरणाऱ्या 14 जणांवर कारवाई

रत्नागिरी:-  रत्नागिरी शहरात, बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्या 14 जणांवर फिरत्या पथकाने कारवाई करून त्यांच्याकडून 7 हजाराचा दंड वसूल केला आहे.  

सर्वत्र कोरोनाने थैमान घातलले आहे. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. लॉकडाऊन शिथीलीकरणानंतर विना मास्क बाहेर फिरणाऱयावर कारवाईच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. तरीही अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे.  रत्नागिरीत शहर परिसरात अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी नगर परिषद, पोलीस व प्रशासनाने फिरते पथकाची नियुक्ती केलेली आहे. वेळोवेळी या पथकामार्फत बाजारात विनामास्क फिरणार्‍यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. बुधवारी 25 नोव्हेंबर रोजी देखील या पथकाने दुकानदार, विकेते, नागरिकांवर नजर रोखली होती. त्यावेळी 14 जण कारवाईच्या रडारवर आले. त्यांच्याकडून पत्येकी 500 पमाणे 7 हजार रु. दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत या पथकाकडून 2 लाखांपेक्षा अधिक दंड विनामास्क फिरणार्‍याकडून वसूल केला आहे.