जिल्ह्यात चोवीस तासात केवळ 9 कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात 59 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंतच्या 24 तासांत एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

दिवसेंदिवस रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने घटत आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने आलेल्या अहवालानुसार संगमेश्वर 3, लांजा 1 आणि रत्नागिरी तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 525 वर पोहोचली आहे.

रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 58 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 49 हजार 366 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी 10 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 8 हजार 525 पैकी 8 हजार 048 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 94.40 टक्के आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.