शुक्रवार 23 ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर 

रत्नागिरी:- श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, वैश्ययुवा व इंफींगो आय केयर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी श्री. राधाकृष्ण मंदिराच्या हॉल मध्ये सकाळी 10 ते 2 या वेळात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
   

या शिबीरामध्ये मशीन द्वारे नेत्र तपासणी, पारंपरिक पध्दतीने नेत्र तपासणी, डोळ्याचे प्रेशर तपासणी, डोळ्यांतील नजरेबाबत सुयोग्य मार्गदर्शन तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. शिबिरात करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या तपासण्या संपुर्णपणे मोफत आहेत. तरी या सर्व उपक्रमांचा सर्वानी जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहनन श्री. राधाकृष्ण वैश्य संस्थेचे अध्यक्ष श्री राजन मलूष्टे तसेच इंफींगो चे डॉ.श्रीधर ठाकुरदेसाई व वैश्ययुवाचे सुमित संसारे, केतन शेट्ये, सचिन केसरकर, अनिश खातु यांनी केले आहे.शिबीरात सहभागी होणा-या प्रत्येकाने येताना मास्क लावून येणे तसेच सोशल डिस्टंनसिंग चे पालन करणे आवश्यक आहे.