जिल्ह्यात पॉझिटिव्ह 35 तर निगेटिव्ह 103 अहवाल

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात केवळ 35 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 103 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या 2.95 वर पोचली आहे.
 

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून घटत आहे. रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यात केवळ काही प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. मागील 24 तासात जिल्ह्यात केवळ 35 पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. यापैकी 10 रुग्ण आरटिपीसीआर तर 25 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यात 1, दापोली 4, खेड 7, गुहागर 4, चिपळूण 5, रत्नागिरी 8, लांजा 3 तर राजापूर तालुक्यात देखील 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
 

जिल्ह्यात चोवीस तासात तब्बल 103 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आता पर्यंत 42 हजार 472 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी 48 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 7 हजार 165 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 89.12 टक्के आहे. जिल्ह्यात नव्याने 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूची टक्केवारी 3.66 टक्के आहे.