विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका

92 जणांवर कारवाई; 20 हजार दंड वसूल

रत्नागिरी:- कोरोना प्रादुर्भावर रोखण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागात जनजागृती करुनही मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर मंगळवारी पोलीसांनी कारवाई केली. शहरासह ग्रामीभागातील ९२ नागरिकांवर कारवाई करत तब्बल २० हजार ४०० दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीसांची अचानक राबविलेल्या कारवाई सत्रामुळे नगरिकांची तारांबळ उडाली. नागरिकांनी मास्कचा वापर न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधिक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांनी दिला आहे.

राज्यात कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सींग , सॅनिटाझर , मास्क  वापरण्याच्या सुचना राज्य सरकारने दिल्या आहेत.   त्यानुसार  रस्त्यावर , सार्वजनिक ठिकाणी , बाजारपेठेत , नागरिक सोशल डिस्टन्सींग अथवा मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे.
पोलीस अधीक्षक रत्नागिरी डॉ . मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तसेच सर्व पोलीस ठाणे मार्फत  ग्रामीण भागात मास्क वापरणे , ठराविक अंतर ठेवणे , स@निटाझरचा वापर करणे याबाबत जनजागृती करण्यात आली होती . जे नागरिक मास्क न वापरता आढळून आले त्यांना मास्कचे वाटप करुन जनजागृती करण्यात आली  होती . मास्क वापरण्यासाठी  पोलीस दलाकडून जनजागृती करुनही  नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत होते.मंगळवारी  रत्नागिरी शहर पोलीस ठाणे , पोलीस निरीक्षक श्री. अनिल लाड व पथक यांनी रत्नागिरी शहर हद्दीतील बाजारपेठेत पोलीस कर्मचारी व नगरपरिषद कार्यालय, रत्नागिरी येथील मालमत्ता विभाग यांच्या संयुक्त  पथकाने एकुण १५ केसेस करुन एकुण ७हजार ५००  रुपये दंड वसुल केलेला आहे .तर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री . सुरेश कदम  यांचे पथकाने रत्नागिरी ग्रामीण हद्दीतील पाली दुरक्षेत्र , जाकादेवी , कोतवडे , चांदेराई , खेडशी येथे पोलीस कर्मचारी व ग्रामसेवक , पोलीस पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मदतीने एकुण ७७ केसेस करुन १२  हजार ९ ०० रुपये दंड वसूल केलेला आहे.

नागरिकांनी कोविड १ ९ अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग व मास्कचा वापर करावा अन्यथा संबधीत शासकिय विभागाकडून कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक  डॉ . मोहित कुमार गर्ग  यांनी केले आहे.