जिल्ह्यात 24 तासांत तब्बल तीन हजार जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:-जिल्ह्यात आज तब्बल 3 हजार 170  कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामूळे जिल्ह्यात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 55 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 724 वर पोचली आहे. काल पासून जिल्ह्यातील 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 277 वर पोचली आहे. 

नव्याने सापडलेल्या 55 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 35 जण आरटीपीसीआर तर 20 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. सर्वाधिक 28 रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील तर चिपळूण तालुक्यात 10 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय संगमेश्वर 8, गुहागर 1, दापोली 2 आणि लांजा तालुक्यात 6 रुग्ण सापडले आहेत.

चोवीस तासात जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 277 वर पोचली आहे. यामध्ये रत्नागिरीतील 54 वर्षीय, राजापूरातील 65 वर्षीय, लांजा येथील 79 वर्षीय व दापोलीतील 75 वर्षीय रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

गेल्या 24 तासांत एकूण 3170 जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेले 174 रुग्ण व अँटिजेन टेस्ट केलेल्या 2996 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 40324 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.