रत्नागिरी तालुक्यात 28 नवे कोरोना पॉझिटिव्ह; शहरात सर्वाधिक 

रत्नागिरी:- कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असताना गुरुवारी रात्री 28 पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात सापडले आहेत. 28 पैकी सर्वाधिक रुग्ण हे शहरातील आहेत.
 

मागील तीन दिवसांपासून रत्नागिरी शहरात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. 24 तासात सरासरी चौदा ते पंधरा रुग्ण सापडत होते. मात्र गुरुवारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात तब्बल 28 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण शहर परिसरातील आहेत. 
 

नव्याने आलेल्या अहवालानुसार रत्नागिरीत आरोग्य मंदिर येथे 1, नाचणे गोडाऊन 1, साळवी स्टॉप 2, पंधरामाड मिऱ्या 1, नॅनो सिटी 1, परटवणे 2, जि प क्वार्टर्स 1, शांतीनगर 1, खेडशी 1, जयगड 1, पऱ्याची आळी 1, शांती नगर 1, काँग्रेस भुवन 2, आडवली 1, सोमेश्वर 2, जाकीमिऱ्या 1, गयाळवाडी 1, खडपेवठार 1, टीआरपी 1, कर्ला 1, सडामिऱ्या 1, नाचणे 2 आणि अन्य एक असे रुग्ण सापडले आहेत.