जिल्ह्यात नवे 63 कोरोना बाधित; पाच रुग्णांचा मृत्यू

अँटिजेनरत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 63 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यातील 23 आरटीपीसीआर तर 40 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. मागील 24 तासात पाच पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 225 झाली आहे. 
 

नव्याने सापडलेल्या 63 रुग्णांपैकी तब्बल 30 रत्नागिरी तालुक्यातील आहेत. यात 21 रुग्ण हे अँटिजेन टेस्ट पैकी आहेत. याशिवाय खेड तालुक्यात 4, गुहागर 3, चिपळूण 5, संगमेश्वर 5, रत्नागिरी 30, लांजा तालुक्यात 16 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत 39 हजार 432 अहवाल तपासण्यात आले असून यापैकी 6 हजार 832 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
 

मागील 24 तासात तब्बल पाच पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात रातनगिरी तालुक्यात 2, गुहागर 2 आणि संगमेश्वर तालुक्यात एका रुग्णचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 225 रुग्णांचा मृत्य झाला असून सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात 66 झाले आहेत. खेड तालुक्यात 38, गुहागर 8, दापोली 25, चिपळूण 52, संगमेश्वर 20, लांजा 6, राजापूर 8 आणि मंडणगड तालुक्यात 2 मृत्यू झाले आहेत.