रोटरी मल्टी डिस्ट्रिक्ट सोलो डान्स स्पर्धेत रत्नागिरीची आकांक्षा साळवी विजेती

650 स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक 

रत्नागिरी:- रोटरी आयोजित मल्टी डिस्ट्रिक्ट सोलो डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेत रत्नागिरीतून सहभागी झालेली आकांक्षा साळवी हिने स्पर्धेवर आपली छाप सोडली आहे. 650 स्पर्धकांमधून आकांक्षा हिने पहिला क्रमांक पटकावला. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. 

रोटरी मल्टी डिस्ट्रिक्ट सोलो डान्स कॉम्पिटिशन स्पर्धा, रोटरी क्लब चाणक्य,  रोटरी डिस्ट्रिक्ट ३२५० यांनी रोटरी कुटुंबियांकरिता व विशेष वर्गवारीतील इतर मुलांकरिता, भारतामधील 16 रोटरी डिस्ट्रिक्ट करिता नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रँड फिनाले साठी प्रसिद्ध अभिनेत्री, ड्रीम गर्ल, नृत्यांगना हेमा मालिनी या उपस्थित होत्या. तसेच रोटरी इंटरनॅशनल  प्रेसिडेंट  इलेक्ट रोटेरीयन शेखर मेहता हे देखील उपस्थित होते.  

रत्नागिरी मधील रोटरी क्लब  रत्नागिरी मीडटाउन चे खजिनदार रोटे. हिराकांत गोपीचंद साळवी व सौ. सायली हिराकांत साळवी यांची सुकन्या कु. आकांक्षा हिराकांत साळवी हिने सोलो डान्स कॉम्पिटिशन मध्ये सहभाग नोंदविला होता.  या स्पर्धेमध्ये  सुमारे ५६० स्पर्धकांनामधुन आकांक्षाचा  पहिला क्रमांक आल्याचं एक्ट्रेस हेमामालिनी यांनी आज ग्रॅण्ड फिनाले मध्ये जाहीर केलं. या कामगिरीने आकांक्षाने रत्नागिरीचे नाव व रोटरी परिवार रत्नागिरीचे नाव संपुर्ण भारतामध्ये उच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे.         

या कामगिरीबद्दल रोटरी परिवार रत्नागिरी यांचेकडून तसेच संपुर्ण रत्नागिरी वासियांकडून कु.आकांक्षा वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आकांक्षाच्या या यशामध्ये तिचे आई-बाबा, नटराज नृत्य क्लासेसच्या संचालीका तिच्या गुरु सौ.सोनम जाधव, तिच्या सहकारी कु. गौरी साबळे व कु. ईशा साळवी, व्हिडिओग्राफर श्री. निलेश कोळंबेकर व श्री. ऋषिकेश लांजेकर, श्री मिनी हॉल चे संचालक श्री. प्रणित शेट्ये, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाउनचे प्रेसिडेंट रोटे. प्रसादजी खेडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे आकांक्षाने सांगितले.