डॉ. शिंदे यांचे धन्वंतरी रुग्णालय झाले कोविड रुग्णालय

रत्नागिरी:- रत्नागिरीतील डॉ. शिंदे यांचे धन्वंतरी रुग्णालयात आता कोविड सेंटर म्हणून कार्यरत झाले आहे. डॉ. मतीन परकार आणि त्यांची टीम येथे कोरोना रुग्णांवर उपचार करणार आहेत.

प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ निलेश शिंदे आणि प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ तोरल शिंदे यांचे धनवंतरी रुग्णालयात आतापासून कोविड रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. रुग्णालयाची क्षमता 30 बेडची असून सध्या कोरोनाच्या 2 रुग्णांवर उपचार सुरू झाले आहे. डॉ मतीन परकर यांच्या देखरेखीखाली इथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. डॉ परकार यांच्यासोबत त्यांची डॉक्टरची स्वतंत्र टीम उपचार करणार आहे.

तर आता डॉ निलेश शिंदे यांची ओपीडी दररोज सकाळी 11ते 2 या वेळेत डॉ. पराग पाथरे यांच्या शशिकांत पोलीक्लिनिक, आरोग्य मंदिर येथे सुरू झाली आहे. यासाठी 7775085566 या क्रमांकावर संपर्क करावा. तर डॉ. तोरल शिंदे या परकार हॉस्पिटलमध्ये सकाळी 11 ते 2 या वेळेत ओपीडी पाहणार आहेत. त्यांकडे नोंदणीसाठी 02352-220089/222942 या क्रमांकावर संपर्क साधावा.

सशुल्क उपचार होणाऱ्या धन्वंतरी रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी 24 तास खुले राहणार आहे. अधिक माहितीसाठी 02352221282/9527044901 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.