नाचणेत पाच पॉझिटिव्ह; तालुक्यात 44 नवे रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात 44 नवे रुग्ण सापडले आहेत. 
 

शहरानजीक नाचणे परिसरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार नाचणे परिसरात पाच नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

याशिवाय दामले हायस्कुल शेजारी 1, कुवारबाव 1, साईभुमीनगर 1, मिरजोळे 2, आंबेशेत 1, हातखंबा 2, रेल्वे कॉलनी 3, पाली 1, भडकंबा साखरपा 1, माळनाका 3, भाट्ये 1, दापोली 1, झाडगाव शेरेनाका 1, मजगाव 1, खालची आळी 1, शिपोशी लांजा 1, संगमेश्वर 1, नेवरे 1, जे के फाईल, कर्ला 1, लांजा बाजारपेठ 1, टीआरपी 1, फगरवठार 1, पॉवर हाऊस 2, पावस 1, शांती नगर 1, संगमेश्वर 1, गणपतीपुळे 1, गुडेवठार 1, चिपळूण 1 आणि अन्य 2 असे रुग्ण सापडले आहेत.