पोलीस उपनिरीक्षक पाचेरीकर यांचा कोरोनाने मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक जोतिबा पाचेरकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते कोरोनामुळे आजारी होते. गेल्या दोन दिवसांपासून ते जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार घेत होते. मात्र, सोमवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले.
 

जोतिबा पाचेरकर हे पोलीस दलातील वायरलेस विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. मात्र सोमवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण पोलीस दलातुन हळहळ व्यक्त करण्यात येत होती.