पोलीस मुख्यालय येथे पुन्हा कोरोनाचा शिरकाव; तालुक्यात 37 नवे रुग्ण

रत्नागिरी:- तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. पोलीस मुख्यालयात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात 37 नवे रुग्ण सापडले आहेत.
 

तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच आहे. शहर आणि परिसर कोरोनाचा हिटस्पॉट ठरत आहे. रविवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये शहर आणि नजिकच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
 

मागील महिन्यात पोलीस मुख्यालयात कोरोनाचे मोठया संख्येने रुग्ण सापडून आले होते. यानंतर या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. दरम्यान रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार पोलीस मुख्यालय येथे तीन रुग्ण सापडून आले आहेत. झरेवाडी येथे 2, खंडाळा जयगड 1, नावडी संगमेश्वर 1, तळेकांटे 1, पांढरा समुद्र 2, शिरगाव 2, रेल्वे कॉलनी 1, फाटक हायस्कुल नजिक 1, जोशी पाळंद 1, मुरुगवाडा 1, शिवाजी नगर 1, पोलीस कर्मचारी 1, आंबेशेत 1, सोनवडे 1, लांजा इंदवली 1, मिरजोळे 1, रेल्वे 1, आरोग्य मंदिर 1, शांती नगर 1, रामआळी 1, देवरुख 1, मेंटल हाॅस्पिटल 2, गावखडी 1, पावस 1, झाडगांव 1, रायपाटण 1, तेली आळी 1, निवखोल 1 आणि केळ्ये गावात 1 रुग्ण सापडला आहे.