डॉ. फुलेच जिल्हा शल्य चिकित्सक; डॉ. बोल्डे कोरोनाच्या पाच हजार रुग्णांची माहिती काढणार

रत्नागिरी:- जिल्हा शल्य चिकित्सक पदावर डॉ. फुले यांना कायम ठेवण्यात आले आहे. रजेवरून पुन्हा रुजू झालेल्या डॉ. बोल्डे यांना स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या सुमारे पाच हजार रुग्णांची माहिती काढण्याची जबाबदारी त्यांना दिली आहे. यामुळे वाद मिटणार की वाढणार याकडे लक्ष लागले आहेे.

दीर्घ आजारी रजेवरून डॉ. बोल्डे काही दिवसांपूर्वीच हजर झाले; मात्र त्यांच्याकडे कार्यभार देण्यात आला नाही. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांच्या विरोधामुळे डॉ. फुले यांच्याकडे शल्य चिकित्सकपदाचा भार आहे. डॉ. बोल्डे हजर झाले त्यांनी पदभार घेतला असला तरी ते फक्त नामधारी आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचा कार्यभार डॉ. फुले यांच्याकडे दिला आहे.
डॉ. बोल्डे यांच्याकडे वेगळी जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यात ते समाधानी आहेत असे सांगितले जाते. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पाच हजार रुग्णांची माहिती काढण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली.