तालुक्यात कोरोनाचे 20 नवे रुग्ण 

रत्नागिरी:- बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात 20 नवे पॉझिटिव्ह सापडले आहेत. याशिवाय लांजा येथील ऍडमिट पाचजण देखील कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर तालुक्यात पालीत 3 रुग्ण सापडले आहेत. 
 

बुधवारी जिल्ह्यात तब्बल 201 रुग्ण सापडून आले होते. बुधवारी रात्री नव्याने अहवाल प्राप्त झाले यात लांजा येथील पाच आणि रत्नागिरी तालुक्यातील 20 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

नव्याने आलेल्या अहवालानुसार शहर पोलीस स्थानकातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय खंडाळा 1, परटवणे 1, कारवांची वाडी 1, जुनी तांबट आळी 1, शिरगाव 1, मारुती आळी 1, मुचरी संगमेश्वर 1, चिपळूण 1, कोंड असुरडे संगमेश्वर 1, खंडाळा 2, कुवारबाव 1, कुरतडे डुगवे 1, साखरपा 1, पडवेवाडी 1, पाली 3 आणि चांदोर येथे एक रुग्ण सापडला आहे.