जिल्ह्यात कोरोनाचा कहर; 24 तासांत 207 कोरोना पॉझिटीव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात आज उच्चांकी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासांत 207 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 4736 झाली आहे. तर आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजच्या अहवालात रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडले आहेत. नव्याने आलेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्ट 107 आणि अँटिजेन टेस्ट केलेले 100 असे एकूण 207 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. प्राप्त अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 54 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय खेड 32, गुहागर 26, चिपळूण 30, संगमेश्वर 47, लांजा 9 आणि राजापूर 9 असे रुग्ण सापडले आहेत.