नेवरेत एकाच घरात 10 पॉझिटिव्ह; तालुक्यात तब्बल 47 नवे रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने होऊ लागल्याचे चित्र आहे. बुधवारी रात्री आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी असून तालुक्यात तब्बल 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात नेवरे येथे एकाच घरात 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. 
 

नव्याने आलेल्या अहवालानुसार तालुक्यातील नेवरे येथे एकाच घरातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यात 3 महिन्याच्या छोट्या बच्चूला, 13 वर्षीय मुलीसह 83 वर्षीय वृद्धाचा देखील समावेश आहे. याशिवाय कुवारबाव येथे देखील एकाच कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 
 

याशिवाय शिवाजी नगर 1, कारवांची वाडी 2, एसबीआय कॉलनी 1, जयगड 1, सिविल 2, रत्नागिरी 3, झाडगाव 3, नाचणे 1, आरोग्य मंदिर 1, सन्मित्र नगर 2, लांजा 1, तांबट आळी 3, मिरकरवाडा 1, भाटीमीऱ्या 1, दापोली पाजपंढरी 1, गवळीवाडा 1, कुवारबाव 5, हातखंबा 1, कडवई 2, शांती नगर 1, जेलरोड 1, नेवरे 10, फणसवळे 1 आणि कोकण नगर येथे 1 रुग्ण सापडला आहे.