जिल्ह्यात कोरोनाचे थैमान; २४ तासात तब्बल १७३ पॉझिटीव्ह

रत्नागिरी:- रत्नागिरीत कोरोनाचा पुन्हा एकदा बंपर धमाका उडाला आहे. २४ तासात तब्बल १७३ पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत तर दोन
रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ४३७२ वर जावून पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने १४१ जणांचा बळी घेतला आहे.

गेले दोन दिवस जिल्ह्यात कोरोनाने कहरच केला आहे. गणेशोत्सवापासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र त्यानंतर कोरोनाबाधित रूग्णांची
संख्या कमी होत आली. गेल्या दोन दिवसांपासून या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवारी १४२ रूग्ण पॉझिटीव्ह सापडले होते. त्यापाठोपाठ आता
गुरूवारी २४ तासात १७३ नवे पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत.

पॉझिटीव्ह सापडलेल्या रूग्णांमध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक रूग्ण पॉझिटीव्ह सापडले आहेत. जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीत ६० तर अँटीजेन
चाचणीत ११३ पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत.
खेडात ५४ रूग्ण या अहवालामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत.
तब्बल ५४ नवे पॉझिटीव्ह रूग्ण खेड तालुक्यात सापडले आहेत.