तालुक्यात 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; नाचणेत सापडले 4 रुग्ण

रत्नागिरी:- बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात नाचणे परिसरात नव्याने चार रुग्ण सापडले आहेत.   

तालुक्यात पुन्हा रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. बुधवारी रात्री नव्याने 22 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरनजिक नाचणे येथे तब्बल चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.   

गुडेवठार येथे 1, माळनाका येथे 1, निवळी 1, जिल्हा परिषद रोड येथे 2, नाचणे 4, गोडबोले स्टॉप 1, आंबेडकर भवन 1, गावखडी 1, खेडशी 2, साखरपा 1, टीआरपी 2, देवरुख 1, गोळप 1, खेड 1, सन्मित्र नगर 1 आणि जयगड येथे 1 रुग्ण सापडला आहे.