अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल

लांजा:– लाँकडाऊन कालावधी गावी आलेल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार शारिरीक संबंध ठेवून तीच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधमाला व त्याला सहकार्य करणाऱ्या लांजा येथील महिलेच्या विरूद्ध लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांजा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पन्हळे येथील अल्पवयीन मुलगी लांजा शहरामध्ये राहणारी हसिना हसन जेट्टी हीची मुलगी या वर्ग मैत्रीणी असल्याने हसिना हिच्या मुलीचा दि. १७ आँगस्ट २०१९ रोजी वाढदिवस असल्याने अल्पवयीन पिडीत मुलगी ही या वाढदिवसाला गेली होती . त्यावेळी आरोपी सुर्यकांत विश्राम कानडे (वय – ५८) हे देखील हजर होते. त्यावेळी हसिना हीच्या मुलीने पिडीत मुलगी हिला हे माझे वडील असल्याची ओळख करुन दिली होती. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी ही कामासाठी मुंबई येथे गेली असता आरोपी सुर्यकांत कानडे याला याची माहिती मिळाली त्यावरून त्याने हसिना हिच्या मुलीकडून पिडीत मुलीचा मोबाईल नंबर घेतला व पिडीत मुलीला मोबाईलवर फोन करुन माझ्या घरी भायखळा येथे जेवणाचे आमंत्रण दिले. त्यानुसार पिडीत मुलगी सुर्यकांत यांच्या घरी गेली असता आरोपी यांनी तीच्यावर बलात्कार केला व कुठे वाचता केलीस तर मान आवळून टाकेन अशी धमकी दिली.

आरोपी सुर्यकांत यांनी पिडीत मुलगी मुंबई येथे असताना वारंवार बलात्कार केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन करण्यात आल्यानंतर सदर पिडीत मुलगीला मार्च महिन्यात लांजा येथील हसिना हसन जेट्टी हिच्या घरी आणून ठेवण्यात आले होते. त्यावेळी हसिना हिने या पिडीत मुलीला हिरव्या बांगड्या व गळ्यात मंगळसूत्र घाळून वावरण्यास सांगितले. मार्च ते मे महिन्यामध्ये सुर्यकांत कानडे या वारंवार गावी आल्यानंतर पिडीत मुलीवर बलात्कार करत होता. आलेल्या शारिरीक संबंधातून हि अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली त्यानंतर सोमवारी रात्री आपली फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलीस सुर्यकांत कानडे व त्याला मदत करणाऱ्या हसिना जेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय चौधर, पोलीस नाईक दिनेश आखाडे, काँन्टेबल सुनील पडळकर हे करीत आहेत.