बिबट्याच्या अवयवांची चोरी; टोळीच्या मुसक्या आवळल्या 

तिघांना अटक, बिबट्याची नख देखील हस्तगत 

लांजा:-जखमी होऊन मृत पडलेल्या बिबट्याचे अवयव चोरीचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात तीन जणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या तिघांकडून बिबट्याची तीन नख देखील जप्त करण्यात आली असून या तिघांना 27 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे आठ दिवसांपूर्वी एका निर्जनस्थळी असणाऱ्या एका जुन्या घरामध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. बराच वेळ बिबटया घराबाहेर न पडल्याने नागरिकांनी वन विभागाला कळविले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्याने वेरवली येथे जाऊन पाहणी करन घरामध्ये बिबट्या नसल्याचे नागरिकांना सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला होता. त्यांनतर मात्र 2 ते 3 दिवस त्याच घरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने गुरख्यानी आत जाऊन पाहिले असता मृतावस्थेत बिबट्या आढळून आला.

 वनविभागाच्या परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका पंढरीनाथ लगड यांनी वन विभागाचे कर्मचा-यांसमवेत सदर ठिकाणची पहाणी केली. सदर ठिकाणची माती खोदन पाहिली असता मृत बिबट्या आढळूण आला. बिबट्याची नख गायब असल्याचे दिसून आले. या प्रकरणी दिनेश राजाराम पवार, रमेश आत्माराम साळसकर आणि शंकर सखाराम दवळकर ( सर्व रा.वेरवली, लांजा) यांना अटक करण्यात आली. तिन्ही आरोपीची कसून चौकशी केली असता सदर आरोपींकडे बिबट्याची ३ नखे मिळून आली. सदर आरोपींनी आपला गुन्हा कबुल केलेला आहे. तिन्ही आरोपीना प्रथम वर्ग न्यायालय लांजा येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीना दि .२७ ऑगस्ट पर्यंत कस्टडी दिली आहे .ही कारवाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी ( चिपळूण ) यांच्या मार्गदर्शना खाली परिक्षेत्र वन अधिकारी वनपाल लांजा सागर पताडे, वनरक्षक लांजा विक्रम कुंभार , वनरक्षक गजापूर सागर गोसावी, वनरक्षक संजय रणधिर यांनी केली.