रत्नागिरी तालुक्यात 22 नवे पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- सोमवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात आरटीपीसीआर अहवालामध्ये 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील काही रुग्ण तालुक्याबाहेरील दाखल रुग्ण आहेत. 
 

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये शांतीनगर येथील 1, साळवी स्टॉप 2, काजरघाटी 1, फणसोप 1, मेंटल हॉस्पिटल 1, कारवांचीवाडी 1, उजगाव 3, साईनगर 1, शिवाजी नगर 1, परटवणे 1, शांतीनगर 1, उद्यमनगर 1, गावडे आंबेरे 1, खेड मधील एक आणि अँन्टिजेन टेस्टमधे पावस येथील 1 डॉक्टर, चर्मालय येथील 1, साळवी स्टॉप 1 आणि खेड मधील एका रुग्णाचा समावेश आहे.