जिल्ह्यात 39 नवे पॉझिटिव्ह; रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात केवळ 39 कोरोना बाधित नवे रुग्ण सापडले आहेत. यानंतर एकूण रुग्णसंख्या 3444 झाली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला आहे. 

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट मधील रत्नागिरीतील 4, ॲन्टीजेन  टेस्ट मधील रत्नागिरीतील 3, कळंबणी 17, चिपळूण 15असे एकूण 4 + 35=39 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

जिल्ह्यात कोरोना मुक्त होण्याचा आलेखही चांगला आहे. आज दिवसभरात 56 रुग्ण बरे झाले आहेत. त्यात जिल्हा शासकीय रुग्णालय 03, कळबणी 02, कामथे 01, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 08,देवधे, लांजा 01, घरडा 12, पेढांबे, चिपळूण 25, माटे हॉल, चिपळूण 4 येथील रुग्णांचा समावेश आहे.आतापर्यंत 2174 रुग्ण बरे झाले आहेत.