आणखी एका डॉक्टरसह तालुक्यात 26 नवे रुग्ण

रत्नागिरी:- मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात नव्याने 26 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. या अहवालनुसार आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. तर सन्मित्र नगर परिसरात चार तर थिबा पॅलेस परिसरात पुन्हा एक रुग्ण सापडला आहे.
 

तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी रात्री नव्याने अहवाल आले. यात अँटिजेन टेस्ट केलेले 22 तर आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
 

नव्याने आलेल्या 26 अहवालांमध्ये सन्मित्र नगर येथील 4, पोलीस मुख्यालयातील 2, गाडीतळ 2, जुनी तांबट आळी 2, परटवणे 1, फणसवळे 1, जाकिमिऱ्या 1, मच्छीमार्केट बाजारपेठ 1, हातीस 2, सामाजिक न्याय भवन 1, लांजा (ऍडमिट) 1, जोशी पाळंद 1, पावस 1, शिवाजी नगर 1 आणि थिबा पॅलेस येथील एक याशिवाय आरटिपीसिआर चाचणीत टिआरपी येथील हॉटेलमधील एकाला, गवळीवाडा येथील एक आणि एका डॉक्टरसह अन्य एका रुग्णाचा समावेश आहे.