संजय गांधी निराधार योजनेचा तालुक्यातील साडेपाच हजार लाभार्थ्यांना लाभ

रत्नागिरी:- शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजना सुरु करण्यात आली आहे. त्या योजनेंतर्गत नागरीकांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. रत्नागिरी तालुक्यात आत्तापर्यंत 5 हजार 431 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना 2 हजार 659 लाभार्थी, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना 1 हजार 686 लाभार्थी, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना 120 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना 758 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना 18 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 190 लाभार्थी एवढ्या लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेतला आहे. या योजनांमध्ये पात्र ठरणार्‍या लाभार्थी यांनी आपल्या जवळचे तलाठी कार्यालय यांच्याकडून अर्ज घेऊन तहसील कार्यालयास सादर करावे अथवा जवळील महा ई सेवा केंद्रात ऑनलाईन अर्ज करावा. या कार्यालयाकडून योजना तात्काळ मंजूर करून पेन्शन सुरू करण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कोणी स्त्री, पुरुष मयत झाला असेल तर त्या कुटुंबांनी राष्ट्रीय कुटुंब साहाय्य योजनेखाली अर्ज करावे. त्या कुटुंबाला एकरकमी रक्कम 20 हजार रुपये इतके अनुदान शासनामार्फत देण्यात येईल असे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सांगितले.