जिल्ह्यात 98 नवे कोरोना बाधित; एका रुग्णाचा मृत्यू

रत्नागिरी:- गेल्या 24 तासात जिल्ह्यात ॲन्टीजेन चाचणीत 91  तर आरटीपीसीआर चाचणीत 7 असे एकूण 98 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2845 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे एकूण मृत्यूसंख्या 102 झाली आहे.

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरी येथील 7 तर ॲन्टीजेन  टेस्ट मधील रत्नागिरी  29, कळबणी 4, कामथे 45, घरडा रुग्णालय 13 येथील रुग्णांचा समावेश आहे.   

शांतीनगर, रत्नागिरी येथील 15 ऑगस्ट रोजी सकाळी ॲन्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 52 वर्षीय कोरोना रुग्णाचा रात्री 12.45 वाजता मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 102 झाली आहे.

आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, तसेच 25 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाले व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1816 झाली आहे.यानंतर जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  927 आहे.