मिऱ्या बंधारा दुरुस्तीसाठी नियोजनमधून 90 लाख

ना. उदय सामंत; आंदोलन होणार स्थगित

रत्नागिरी:- धूप झालेल्या मिर्‍या बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी दोन महिन्यांपूर्वीच 99 लाख 92 हजाराच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे; मात्र 10 टक्केच निधी वापराचे आदेश आहेत. त्यात कोविडमुळे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे; मात्र जिल्हा नियोजनच्या बैठकीत 90 लाख देण्याच्यादृष्टीने निर्णय होईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  

यावर बोलताना सामंत म्हणाले, पत्तन विभागाने मिर्‍या बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी दिलेल्या 99 लाख 92 हजाराच्या प्रस्तावाला दोन महिन्यांपूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली आहे; मात्र कोरोनाच्या महामारीमुळे राज्य आर्थिक संकटात आहे. शासनाने जिल्हा नियोजनच्या निधीला कात्री लावली आहे. 10 टक्केच निधीचा वापर करावा, असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे मिर्‍या बंधार्‍याच्या दुरुस्तीला निधी देण्यास अडथळा आला; मात्र आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 90 लाखाचा निधी देण्याचा निर्णय आम्ही घेऊ.