सरकारी नोकर असल्याची बतावणी करत महिलेची 12 लाखांची फसवणूक 

रत्नागिरी:- सरकारी नोकर असल्याची बतावणी करत चांदोर येथील महिलेची तब्बल 12 लाख 5 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

मधुकर दोरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात चांदोर येथील एका महिलेने शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिलेला आरोपी मधुकर दोरकर याने सरकारी नोकर असल्याची बतावणी करून 13 फेब्रुवारी 2020 ते  31 जुलै 2020 या कालावधीत रोख आणि चेकच्या स्वरूपात तब्बल 12 लाख 5 हजार 500 रुपये घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने शहर पोलीस स्थानकात धाव घेत फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणी भादवि कलम 170, 417, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.