जिल्ह्यात कोरोनाचे आणखी पाच बळी; मृत्यूसंख्या 78

कोरोना बाधितांची संख्या 2200 पार, 24 तासात 65 नवे रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाची झपाट्याने वाढ होत असताना वाढणारी मृत्यूसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. मागील चोवीस तासात तब्बल पाच कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 78 वर पोचली आहे. याशिवाय मागील 24 तासात  प्राप्त अहवालांमध्ये 65 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 213  झाली आहे. 

नव्याने पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील ४, कामथे ४४, लांजा १, गुहागर ४, दापोली ५ आणि ॲन्टीजेन टेस्ट केलेल्या ७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 हजर 213 वर पोचली आहे. यापैकी 1 हजार 489 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 78 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 646 एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 
 

रविवारी प्राप्त झालेल्य माहितीनुसार 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. दापोली येथील एका 43 वर्ष वयाच्या व्यक्तीचा अहवाल ॲन्टीजने टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला कळबणी येथे दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा मृत्यु झाला. तसेच दापोली येथील 70 वर्षीय महिलेचा देखील मृत्यु झाला आहे. झरीरोड, चिपळूण येथील 64 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच राजिवडा, रत्नागिरी येथील 64 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. मारुती मंदीर, रत्नागिरी येथील 44 वर्षीय रुग्णाचा कोल्हापूर येथे उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 78 झाली आहे.