पोलीस अधिक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव 

रत्नागिरी:- जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. या कार्यालयात काम करणारा क्लार्कला कोरोनाची लागण झाली आहे. यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. 
 

रत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार पोलीस अधिक्षक कार्यालयातील एका क्लार्क आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पोलीस अधिक्षक कार्यालयातील कर्मचारी धास्तावले आहेत. याशिवाय दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय 2 डॉक्टर देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरोग्य मंदिर 3, पोलीस लाईन 3, आंबेकरवाडी 1, घाणेकरवाडी 1, एमआयडीसी 2, गावखडी 1, भाट्ये 1, राजीवडा 1, नाचणे 1, शिवाजी नगर 1, थिबा पॅलेस 1, सिविल हॉस्टेल 1 आणि बोर्डिंग रोड येथे 1 रुग्ण सापडला आहे.