24 तासांत कोरोना बाधितांची संख्या शंभरीपार; एकूण रुग्णसंख्या दोन हजारनजीक

आणखी एक कोरोनाबळी; जिल्ह्यात आत्तापर्यंत 64 मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात सातत्याने पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सायंकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 53 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत तर काल रात्री उशिरा 51 पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने गेल्या 24 तासांतील रुग्णसंख्या 104 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1985 इतकी झाली आहे.

अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रत्नागिरी येथे जिल्हा रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या एका रुग्णाचा आज सायंकाळी मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 64 झाली आहे

गेल्या 24 तासांत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी 31, रत्नागिरी अँटिजेन 6, कामथे 50, दापोली 2, गुहागर 1, कळंबणी 13, लांजा 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.