विनापरवाना जिल्ह्यात याल तर खबरदार 

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येण्यासाठी पासची आवश्यकता असून विनापास कुणालाही जिल्ह्यात प्रवेश घेता येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या कशेडी घाटात रांगा लागल्या असून घाटात वादाचे प्रसंग घडत आहेत.
 

रविवारी देखील असाच प्रसंग उद्भवला. खेड येथे खोटा पास असलेल्या वाहनाला देखील पकडण्यात आले आहे. मात्र सध्या तरी विनापास जिल्ह्यात येण्याचा कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नाही अशी माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

गणेशोत्सवाला काही दिवस उरले असताना रविवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईतुन येणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांची गर्दी सुरू झाली असून, विनापास जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आल्या आहेत, मात्र अजूनही शासनाकडून चाकरमानी संदर्भात कोणतेही नियमावली स्पष्ट करण्यात आले नसून याविषयी चाकरमानी मध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, खोटे पास दाखवून जिल्ह्यात प्रवेश करू पाहणार्यावर प्रशासनाकडून रविवारी कारवाई करण्यात आली.