जिल्ह्यात 55 नवे कोरोना पॉझिटिव्ह; रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक

त्नागिरी:– शनिवारी रात्री  प्राप्त  अहवालानुसार जिल्ह्यात 55 नवे  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 20 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात  असणाऱ्या  एकूण पॉझिटीव्ह रुग्नांची संख्या आता 1 हजार 881 झाली  आहे.

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 20, कळंबणी 17, कामथे 10, देवरुख  4, दापोली 3 आणि रायपाटण मध्ये 1 रुग्ण सापडला आहे.