तालुक्यात 2 पोलीस, एका नर्ससह 21 जण पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार तालुक्यात 21 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यात 2 पोलीस आणि एका नर्सचा समावेश आहे. 
 

रत्नागिरी तालुक्यात सापडलेल्या 21 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अशोकनगर परटवणे येथील 1, पोमेंडी बु. 1, जि. प. रेस्ट हाऊस समोर शांतीनगर नाचणे 2, साई नगर 2, खेडशी 1, पेठ पूर्णगड 1, जागूष्टे कॉलनी 1, वैभव विहार कॉम्प्लेक्स माळनाका 2, कुवारबाव पोलीस क्वाटर्स 1, बोर्डिंग रोड 1, कापडगाव बौद्धवाडी 1, सिविल ऍडमिट 2, 2 पोलीस कर्मचारी तर एका सिविल नर्सचा या 21 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे.