जिल्ह्यात 62 नवे कोरोना रुग्ण

रत्नागिरी:- सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 62  नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 25 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर माळनाका, रत्नागिरी येथील डॉ. भिडे यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. 

रत्नागिरी तालुक्यात 25, दापोली 11, कामथे 8,गुहागर 8, रायपाटण राजापूर 3 तर कळबणी,खेड येथे 7 रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 618 इतकी झाली आहे.