जिल्ह्यात 37 नवे कोरोना बाधित; तिघांचा मृत्यू

रत्नागिरी:– जिल्ह्यात मागील 24 तासात  प्राप्त अहवालांमध्ये 37 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचीसंख्या 1 हजार 557 झाली आहे. उपचारा दरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 52 वर पोचली आहे. 

नव्याने पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 4 रुग्ण, दापोली 11 रुग्ण, कामथे 20 रुग्ण आणि गुहागर मधील 2 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी मृत 3 रुग्णांमध्ये 2 रुग्ण रत्नागिरी व 1 रुग्ण राजापूर येथील आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 52 झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1 हजार 557 असून बरे झालेले रुग्ण 987 आहेत. उपचारा दरम्यान 52 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू  झाला असून एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 518 इतकी आहे. 
 

रविवारी 34 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या 34 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.  यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 987 झाली आहे. रविवारी बरे झालेल्यांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथील 8, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर 7,  कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 11, कोव्हीड केअर सेंटर घरडा खेड येथील 8 रुग्ण आहेत.