चुलत भावाचं लग्न पडलं महागात… पूर्णगडला असा पसरला कोरोना

रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड येथे कोरोनाचे सहा रुग्ण सापडून आले. सहा नातेवाईक एकाचवेळी कोरोनाग्रस्त सापडल्याने पूर्णगडला खळबळ उडाली. मात्र या ठिकाणी काही दिवसांपूर्वी झालेल्या लग्न समारंभातून कोरोनाचा फैलाव झाल्याचे समोर आले आहे.
 

या लग्न समारंभात कोविड रुग्णालयातील एक नर्स सहभागी झाली होती. कोविड टेस्टिंग लॅब मध्ये या नर्सची ड्युटी लागली होती. पूर्णगड येथे चुलत भावाच्या लग्नसाठी ही नर्स सहभागी झाली. हळद, लग्न समारंभ आटपून आल्यानंतर या नर्सला ताप भरून आला. कोविड टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आणि सर्वांचीच चिंता वाढली. या नर्सच्या संपर्कात आलेल्या पूर्णगड येथील प्रत्येकाचा स्वॅब घेण्यात आला आहे. आतपर्यंत यातील सहाजण पॉझिटिव्ह आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.