रत्नागिरीत आणखी तीन डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात

रत्नागिरी:- शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी तालुक्यात तब्बल 31 जण कोरोनाबाधित आढळून आले. या 31 जणांमध्ये नव्याने 3 डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या तीन डॉक्टर्स पैकी 1 जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ असून इतर दोन डॉक्टर खाजगी डॉक्टर्स आहेत.
 

रत्नागिरी तालुक्यात 31 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या बाल रोग तज्ञासह त्यांची पत्नी आणि मुलगी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तसेच थिबा पॅलेस आणि काँग्रेस भुवन येथील एक खाजगी डॉक्टर कोरोना बाधित सापडली आहे. 
 याशिवाय कसोप येथील एक आणि पूर्णगड मधील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.