भिक्षुकाच्या डोक्यात रॉड मारून रोकड लंपास

रत्नागिरी:- रेल्वे स्टेशन परिसरातील एका पडक्या इमारतीत झोपलेल्या भिक्षुकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खिशातील २ हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने पळवून नेल्याप्रकरणी संशयितां विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप प्रकाश यादव (रा देवळे, चाफोली) हे रत्नागिरी शहरात मिरकवाडा, राजीवडा परिसरात भिक्षुकी करून पोट भरतात. सोमवारी नेहमीप्रमाणे संदीप हे भिक्षुकी करून नेहमी प्रमाणे झोपण्यासाठी रेल्वे स्टेशन येथील एका अर्धवट बांधकाम झालेल्या पडक्या इमारती झोपायला गेले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते झोपलेल्या इमारतीत अर्जुन भिमाप्पा कल्लापा पवार हा आला व हातातील लोखंडी रॉड संदीप यांच्या डोक्यात मारून त्याना रक्तबंबाळ केले. यावरच न थांबता त्यांचे कपडे काढून खिशातील २ रुपयांची रक्कम जोरजबरदस्तीने पळवून नेली.जखमी झालेल्या संदीप यादव याना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी संदीप यादव यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी अर्जुन भिमाप्पा कल्लापा पवार याचे विरोधात भा.द.वि.क ३९४  अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास एपीआय रायसिंग पाटील करीत आहेत.