रत्नागिरी:- तालुक्यातील नाटे येथे आज नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. मात्र, त्या रुग्णाला नेण्यास गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यासह पोलिसांना तेथील ग्रामस्थांनी विरोध करीत त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना आज सकाळी घडली. त्यामुळे त्या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साखरी नाटे येथे सोमवारी दोन कोरोना रुग्ण सापडले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य पथक रुग्णवाहिका घेऊन गावात गेले असता तेथील जमावाने कर्मचाऱ्यांना गावात येण्यास विरोध केला त्यामुळे त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. त्यानंतर जमावाने आरोग्य कर्मचारी व पोलिसांवर हल्ला केला. यावेळी शासकीय वाहनांवर दगड फेक करण्यात आली. त्यामध्ये वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच एक आरोग्य कर्मचाऱ्याला दुखापत झाली आहे.